वेळू- नसरापूर या गटातून जिल्हा परिषदेसाठी सुशील विभुते इच्छुक
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर गावातून गेल्या काही वर्षांपासून समाजकारण, शिक्षण आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले या सर्व क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आणि स्वतःच्या कष्टांवर उभे राहिलेले नेतृत्व आहे.
सुशील विभुते हे पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे राज्यस्तरीय पदाधिकारी असून, सर्पमित्र आणि निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांना दिशा देणारे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली आज हजाराहून अधिक तरुण कार्यकर्ते महाराष्ट्रभर कार्यरत आहेत.
त्यांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते करत असलेली सर्व समाजसेवा आणि निसर्गरक्षणाची कामे स्वतःच्या खर्चातून केली जातात,
त्यांनी आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची, संस्थेची किंवा शासकीय मदत घेतलेली नाही. समाज, निसर्ग आणि शिक्षण यासाठी असलेली त्यांची खरी निष्ठा हीच त्यांच्या कार्याची ताकद आहे.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक जिल्हा परिषद शाळा मोफत रंगवून दिल्या, भित्तिचित्रे तयार केली आणि अनेक शाळांना चार ते पाच कम्प्युटर भेट दिले.
यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे नवे दालन खुले झाले आहे.
तसेच दरवर्षी त्यांच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून चार ते पाच हजार झाडे विविध गावांमध्ये लावण्याचा उपक्रम राबवला जातो. आदिवासी भागातील मुलांना गणवेश, मिठाई, खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.
आपत्ती, पूर, आग किंवा इतर संकटाच्या प्रसंगी सुशील विभुते हे नेहमीच मदतीसाठी पुढे येतात. त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना दिलासा दिला आहे.
नसरापूर-वेळू या गटातून जिल्हा परिषदेसाठी सुशील विठ्ठल विभुते यांना संधी मिळालीच पाहिजे. कारण समाजकारण, शिक्षण आणि निसर्ग संवर्धन या सर्व क्षेत्रात कार्यरत असलेला असा प्रामाणिक उमेदवार दुर्मिळ आहे, अशी सर्वत्र चर्चा आहे.




