ताज्या घडामोडी

भोरमध्ये भक्तीभाव आणि देशभक्तीचा संगम ! भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या जवानांचा हस्ते आरती !! श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राकडून जवानांचा सत्कार


भोर : भोर तालुक्यातील भारतीय सैन्यात भरती झालेल्या इम्रान इद्रिसी (संजय नगर भोर), संदेश लांडे (तळे म्हसवली), सौरभ पारठे (आपटी), आणि ओंकार वाटकर (गोळेवाडी म्हसर) या तरुणांनी भोर तालुक्यासह परिसराचा अभिमान वाढवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात करण्यात आला. सेवाकेंद्राचे प्रमुख स्वामी सेवेकरी संतोष कदम यांच्या उपस्थितीत आरतीचे आयोजन करून या नव्या जवानांचा सन्मान करण्यात आला.

Advertisement

कार्यक्रमात गावकऱ्यांनी व सेवेकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुढील सेवेत ते देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास संतोष कदम यांनी व्यक्त केला. त्यांनी युवकांना धर्म, सेवा आणि देशभक्तीचा संदेश देत समाजाकडून अशा युवा प्रेरणांना सदैव पाठबळ मिळावे, असे आवाहन केले.

देशरक्षणासाठी पुढे सरसावलेल्या या तरुणांनी परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. भरती झालेल्या तरुणांवर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!