ब्रेकिंग न्यूज

पुणे व पिंपरी चिंचवड उद्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


 

पुणे : पुणे शहर व जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड भागात आज दिवसभर वारा आणि विजेसह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.  तसेच या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचुन रस्ते जाम होऊन वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली.

Advertisement

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!