सामाजिक

धर्मवीर शंभुराजे बलिदान दिनानिमित्त शंभुराजेंच्या दुधाई धारामाता गाडे यांच्या वंशजा कडुन तुळापुर,वढु बुद्रुक मध्ये अभिवादन.


  1. भोर: सालाबाद प्रमाणे या ही वर्षी कापुरहोळ येथील ग्रामस्थ,तरुणमंडळ,महिला मोठ्या प्रमाणात तुळापुर,वढु बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती शंभुराजेंच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्याकरिता येत असतात,याच दिवशी कापुरहोळ गावाची ग्रामदेवी जानुबाई व भैरवनाथाच्या यात्रेचा दुसरा दिवस असतो,तरी ही हे ग्रामस्थ यात्रा विषय बाजुला ठेऊन आपल्या शंभुराजेंच्या समाधी स्थळावर येऊन अभिवादन करत असतात, पुर्ण 40 दिवस धाराऊमाता वंशज पायात चप्पल वगेरे घालत नाहीत,गोड-धोड खात पित नाहीत, रोज धाराऊमाता स्मारकामध्ये पुजापाठ केली जाते. या कार्याकरिता गावातील सर्वच तरुण एकत्र येऊन तुळापुर, वढु बुद्रुकला जाण्या-येण्याचे तसेच नाष्टा, जेवण असे नियोजन करतात.
    याकामी धाराऊमाता वंशज अमित गाडे,पै.राहुल गाडे, योगेश गाडे, बाबु गाडे, म्हस्कोबा गाडे, गोरक्ष आहिरे, मयुर गाडे,मच्छिंद्र गाडे,महेंद्र गाडे,शंकर देवघरे.हे सर्वजण मिळुन दर वर्षी योग्य नियोजन करत असतात, म्हणुन ग्रामस्थ व महिला मंडळ समाधान व्यक्त करत होते.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!