क्राईम

खेडशिवापूर येथे जुन्या वादाच्या रागातून एकला जबर मारहाण : तरुणावर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला


खेडशिवापूर : शनिवार दि. ३१ मे रोजी रात्री ११:३० वाजता जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवापूर येथे एका तरुणाला शिवीगाळ करत चौघांनी लोखंडी रॉड, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दगड डोक्यात मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुणे – बेंगलोर हायवे लगत असलेल्या शिवापूर बागेत घडला असुन या घटनेत तरुण जखमी झाला आहे. बागेत वरदळीच्या ठिकाणी प्रकार घडला असल्याने सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

याप्रकरणी साहिल राजेंद्र गोगावले  (वय, १८ रा. गोगलवाडी, ता. हावेली, जि. पुणे ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून प्रेम कसबे, आदित्य गायकवाड दोघेही रा. शिंदेवाडी, ता. भोर, जि. पुणे व इतर २ अनोळखी मुले (नाव व पत्ता माहीत नाही) या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पुणे-बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या खेड शिवापूर बागेत रात्री पेट्रोल संपल्यामुळे थांबला असता आरोपींनी   जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी रॉड मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड मारल्याने फिर्यादी चक्कर येऊन खाली पाडला त्यावेळी इतर २ मुलांनी हाताने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, त्यांच्या विरूद्ध राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर २११/२०२५ BNS कलम ११८(१), ३५२, ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवलदार मदने २३२० तसेच तपास अंमलदार पोलीस हवलदार निकम १०५४ हे तपास करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!