सामाजिक

किरण दगडे पाटील यांच्या मोफत काशीयात्रा,महालक्ष्मी,बाळूमामा यात्रेचा 17500 नागरिकांना लाभ


भारतीय जनता पार्टीचे नेते किरण दगडे पाटील यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे, अध्यात्माच्या आनंदाने सुखावलेल्या हजारो नागरिकांना चार काशीयात्रा, चार कोल्हापूर दर्शन यात्रा पूर्ण केल्या आहेत. मोफत काशीयात्रेचा 12000 तर महालक्ष्मी आणि बाळूमामा यात्रेचा 5500 अशा एकूण 17500 नागरिकांनी लाभ घेतला आहे.

भोर विधानसभा क्षेत्रातील हजारो वृद्ध आई-वडिलांना काशीत भगवान विश्वनाथाचे दर्शन घडवले आहे, किरण दगडे पाटलांच्या या कामाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांनी धावपळीच्या या जगात मनशांतीचं महत्व किती आहे, हे अध्यात्माची कास धरल्याशिवाय कळत नाही. संपूर्ण आयुष्य सेटल करत असताना  धार्मिक संस्कृतीपासून माणूस दुरावतो. हेच अंतर कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडुन होत आहे,

Advertisement

रेल्वेत यात्रेला जाणाऱ्या ज्येष्ठांच्या सुख सुविधांसाठी मोठी तयारी केली जाते, त्यांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंत काळजी घेतली जाते, त्यांच्या सेवेकरीता ट्रेनमध्ये डॉक्टरांचा टीम सोबत ठेवलली जाते, जेष्ठ मंडळींच्या हातपाय दाबण्यापासून सर्व काळजी आरोग्य पथक घेत असते.         आत्ता पर्यंत यशस्वी चार काशीयात्रा, कोल्हापूरची अंबाबाई, आदमापुरचे बाळूमामा दर्शन यात्रा पार पडल्या. कोल्हापूर दर्शन साडेपाच हजार नागरिक, काशीयात्रा बारा हजार इतक्या नागरिकांना अध्यात्माच्या जवळ नेण्याचं कार्य किरण दगडे पाटील करत आहेत.

त्यांच्या या उपक्रमात अध्यात्माची जवळीक साधत असताना माणसं माणसांच्या जवळ आली, ओळख झाली, त्यामधून ऋणानुबंध निर्माण झाले आहेत, लोकसेवा करण्याचा हा प्रवास अविरत सुरू राहण्यासाठी भोर विधानसभा मतदार संघातील नागरिक त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहतील हा विश्वास त्यांना आहे, या उपक्रमातुन ते हजारो आई-वडिलांचे दर्शन घडवत आहेत, हे पुण्याचेच काम करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!