किरण दगडे पाटलांना नऱ्हे पंचक्रोशीतील युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
भोर : भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यामधील नऱ्हे गावातील युवकांनी अपक्ष उमेदवार किरण दादा दगडे पाटलांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. नऱ्हे गावच्या पंचक्रोशी मध्ये गावा- गावात जाऊन त्यांचे निशाणी असलेली किटली हे चिन्ह प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचे काम ही मंडळी करत आहे.
Advertisement
आकाश गोळे, मोनुभाऊ काटकर, ओमकार गोळे आणि इतर 45-50 तरुण मुलांनी सोशल मिडियावर किरण दगडे पाटलांचे व्हाट्सअप ‘स्टेटस’ ठेवून उत्तम प्रकारे प्रचार सुरु केला आहे. हे युवक मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन सकारात्मक पद्धतीने दगडे पाटलांचा प्रचार करत आहेत, ज्यामुळे गाव- गावात एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे.
किरण दादा दगडे पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नऱ्हे गावाच्या युवकांनी त्यांचे निवडणुकीत काम करण्याचे ठरवलेले आहे.
Advertisement




