क्राईम

कापूरहोळमध्ये मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न ! नागरिकांच्या तत्परतेने चोरटे पकडले


 

कापूरहोळ : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील कापूरहोळ (लोहार वस्ती) येथे 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुमारास घरफोडीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली. पहाटे साधारणपणे एकच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात नागरिकांच्या तत्परतेमुळे एक चोरटा पकडला गेला असून त्याचे दोन साथीदार पळून गेले आहेत.

फिर्यादी आनंद ठकसेन लोहार (वय 44, व्यवसाय – सुतारकाम, रा. कापूरहोळ) यांच्या घराचे दार व खिडक्या तोडून काही अज्ञात व्यक्ती घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. अचानक झालेल्या आवाजामुळे लोहार कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि त्यांनी आरडाओरड केली. गोंधळ ऐकून वस्तीतील नागरिक मदतीला धावून आले.

Advertisement

चोरटे घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना प्रेम प्रभाकर जेधे (वय 20, रा. कारी, ता. भोर) हा चोरटा नागरिकांच्या हाती लागला. त्याच्याकडून एमएच 11 केडब्ल्यू 4408 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली. मात्र त्याचे दोन साथीदार तेजल करण जाधव (रा. पंढरपूर फाटा, शिरवळ) आणि सनी संतोश कोळी (रा. सारोळा, ता. भोर) अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

पोलिस तपासात आरोपी तेजल जाधव याच्यावर पूर्वीच आणखी एक गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा गुन्हा पोलिस हवलदार माने यांनी नोंदवला असून पुढील तपास पोलिस हवलदार निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक गवळी यांच्या देखरेखीखाली पार पडली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!