राजकीय

अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी इतर उमेदवारांना धडकी भरवणारी


भोर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे अ विरोधकांच्या नाकीनव आणले आहे, त्यांनी आता प्रचारात देखील आघाडी मिळवली आहे, कोंडे यांनी जिल्हा परिषद वॉर्डनुसार कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सत्र सुरू केलं असून याला उत्तम असा प्रतिसाद देखील मिळतोय, मतदानापूर्वीची ही विवरचना आखली जात असून समोरील प्रतिस्पर्धी उमेदवारांना निवडणुकीच्या रणांगणात चित्रपट करणार असल्याचं बोललं जातंय,

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे 2  दिवस राहिले असल्यामुळे संपुर्ण मतदार संघात राजकीय रणधुमाळी सुरू असून  कुणी आपल्याला जास्तीत-जास्त संघटना तसेच सर्व सामान्य लोकांचा पाठिंबा मिळावा याकरिता मतदार संघात नवनवीन डावपेच आखले जात असुन संपुर्ण लक्ष लागून राहिलेल्या भोर- राजगड (वेल्हा), मुळशी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे, कुलदीप कोंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन त्यांचे निवडणुक चिन्ह रिक्षा हे मतदासंघांतील घरो- घरी पोचले आहे.

Advertisement

आपल्या स्वतः च्या ताकदीवर ते मतदार संघात काही डावपेच आखण्यासाठी जिल्हा परिषद वॉर्डनुसार कार्यकर्त्यांच्या बैठका घेतायेत, उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचारात घेतलेली ही आघाडी सध्या विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी आहे,आजवर इतिहास पाहिला तर या मतदारसंघात कधी अपक्ष असा तगडा उमेदवार रिंगणात नसल्याने त्याचा विजय होऊ शकलेला नाही, मात्र 2024 ची निवडणूक इतिहास घडवेल असे चित्र कुलदीप कोंडे यांच्या झंजावातात दिसतोय, कुलदीप कोंडे हाच आमचा नेता आणि रिक्षा हेच आमचे निवडणूक चिन्ह असं म्हणत कार्यकर्ते देखील प्रचाराच्या कामाला दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचे निदर्शनास येत आहे, खरंतर विरोधकांनी कुलदीप कोंडे नावाची धास्ती घेतली आहे.

मुळशीमध्ये नुकताच कोंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद वॉर्ड मधील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून निवडणुकीची रणनीती आखली आहे, कुलदीप कोंडे निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांच्या एक पाऊल पुढे चालत असून येणाऱ्या निवडणुकीत आपली विजय पताका फडकवतील असे चित्र तयार झाले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!