अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
शिंदेवाडी : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनिष कोंडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग सेलच्या वतीने व सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नसरापूर यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भोर तालुक्यातील सैनुमेरो निर्माण प्रायव्हेट लिमिटेड शिंदेवाडी येथे करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे दिली गेली, तसेच विविध आरोग्याच्या समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन देखील केले.
२२ जुलै रोजी अजितदादा पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कंपनीचे MD पराग मेंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करुन झाली, ग्रामीण भागात या शिबिराचे आयोजन केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेता यावा हा मानस होता. शिबिरामध्ये ६०० च्यावर नागरिकांची तपासणी कऱण्यात आली, काहींना पुढील उपचारासाठी बोलवण्यात आले आहे.
सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नसरापूरचे सर्वेसर्वा डॉक्टर राजेंद्र डिंबळे, मंगेश सरपाले, ऋतुजा कोंडे, पुजा खुटवड, अक्षय वारभुवन, या तज्ञांनी सर्वांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या व शक्य आहे त्यांना शिबिरामध्येच औषध उपचार केले गेले, तसेच काही नागरिकांना पुढील उपचारासाठी पुन्हा बोलवण्यात आले आहे. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची तुकडी देखील दाखल झाली आहे. नागरिकांना यापूर्वीही मनिष कोंडे यांच्या आयोजित केलेल्या विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध वैद्यकीय समस्यांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सहकार्य केले गेले होते.त्याचबरोबर अनेक रुग्णांवर विविध प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया देखील पार पडल्या आहेत.
यावेळी कार्यक्रमास मनीष कोंडे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग सेल) चैतन्य जोशी, आदित्य सोळंकी, रोहन खोपडे, संजय बावळेकर, दत्तात्रय बावळेकर, उदय कुलकर्णी, आशुतोष बगाडे, प्रशांत कुमावत, विजया भोसले, उमा सोंडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन त्याचा लाभ मिळवला.




