राजकीय

बारामती लोकसभा मतदारसंघमध्ये महायुतीची समन्वय बैठक संपन्न


मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतचीच्या घटक पक्षाची समन्वय बैठक संपन्न झाली त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सुनेत्रा पवार याच महायुतीच्या उमेदवार असतील असे सांगितले, तरी त्यांना विक्रमी मतांनी निवडुन देऊन तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना देशाचे पतंप्रधान करण्याचे आव्हान महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना केले.

राहुल कुल यांनी आपल्या भाषणात सांगितले की विजय आपला निश्चित असुन आपणा सर्वांनी मिळुन जास्तीत-जास्त मताधिक्य देण्याचा संकल्प करूयात.

Advertisement

रमेश कोंडे शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात आवर्जुन उलेख केला भाजपा – शिवसेना युतीची मते आहे अशी असुन आत्ता आपल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) आल्याने आपली ताकद वाढली असुन फक्त विक्रमी मताधिक्य घ्यायचे आहे.

विक्रम शेलार रिपाइं (आठवले गट) यांनी सुध्दा रिपब्लिकन पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात उतरुन विजय खेचुन आणण्यात मोलाचा वाटा उचलतील अशी ग्वाही दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!