ताज्या घडामोडी

पुणे-सातारा महामार्गावर फसवणुकीचा नवा फंडा ! पंक्चरच्या बहाण्याने गुजरातच्या वाहनचालकाला गंडा !! राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


खेडशिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर वाहनचालकांना पंक्चरचा बहाणा करून आर्थिक गंडा घालण्याचा प्रकार खेड-शिवापूर येथे उघडकीस आला आहे. वाहनाचे टायर पंक्चर असल्याचे सांगून त्यामध्ये महागड्या केमिकलच्या बाटल्या टाकण्यास भाग पाडत गुजरातमधील वाहनचालकाची तब्बल आठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत डेनेश बिखाभाई भंडेरी (वय ३०, रा. कामरेज, जि. सुरत, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. १६ नोव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास ते GJ 05 JK 5337 या वाहनातून प्रवास करीत असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या वाहनाचा टायर पंक्चर असल्याचा इशारा केला. त्यानुसार ते जवळील पंक्चर दुकानात गेले. तेथे आणखी दोघांनी टायरमध्ये महागड्या केमिकलच्या बाटल्या टाकण्यास सांगितले. प्रत्येकी २१०० रुपये किमतीच्या बाटल्या असल्याचे सांगत चार बाटल्या टायरमध्ये टाकून घेतल्या. त्यापोटी फोन-पेद्वारे आठ हजार रुपये स्वीकारले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भंडेरी यांनी पोलिसांत धाव घेतली.

राजगड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राणे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!