ताज्या घडामोडी

भरदुपारी घरफोडीने भोंगवलीत खळबळ ! ३.६९ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास


सारोळा : भोर तालुक्यातील भोंगवली येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विवेक विष्णू पाटील (वय ६४, रा. भोंगवली, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

फिर्यादीनुसार, चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटाचा लॉकर फोडून २० ग्रॅम व १० ग्रॅम वजनाची दोन सोन्याची मंगळसूत्रे, दोन सोन्याच्या नथी, चांदीची १२ जुनी नाणी आणि पाच हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड व पोलीस हवलदार मदने करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!