क्राईम

भोर तालुक्यातील पारवडीत कोयत्याचा थरार ! दोघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक


नसरापूर : भोर तालुक्यातील पारवडी येथे जुन्या वादातून कोयत्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात एकाच्या छातीवर गंभीर वार झाला असून एका तरुणाच्या गालावर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पारवडी गावातील काही व्यक्तींमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता. त्याच वादाचे पर्यवसान बुधवारी झालेल्या हाणामारीत झाले. वादावादी वाढल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात हातातील कोयत्याने हल्ला केला. यामध्ये एका व्यक्तीच्या छातीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला, तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या गालावर कोयत्याचा फटका बसल्याने त्यालाही दुखापत झाली.

Advertisement

घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गावातील शांततामय वातावरणाला गालबोट लावणाऱ्या या घटनेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!