ताज्या घडामोडी

नसरापूरच्या दुर्दैवी घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! वंचित भोर तालुक्याकडून राजगड पोलीसांना निवेदन


भोर : नसरापूर प्रकरणातील अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी भोर तालुक्याच्या वतीने आज (३ मे) राजगड पोलीस चौकीत निषेध नोंदवून निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. निवेदनात संबंधित प्रकरणाचा त्वरित आणि सखोल तपास करून आरोपीवर कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

पीडित चिमुरडीला जलद आणि न्याय्य न्याय मिळावा, यासाठीही आग्रह धरला गेला. समाजात अशा विकृत प्रवृत्तीला कोणतीही मोकळीक मिळणार नाही, हा स्पष्ट संदेश देण्यासाठी उदाहरणात्मक कारवाई आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

वंचित बहुजन आघाडी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी ठामपणे उभी राहिली आहे आणि पुढेही राहणार आहे. पक्षाचे नेते म्हणाले, “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!” या घटनेने संपूर्ण समाज हादरला असून, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने या मागणीचा तातडीने गांभीर्याने विचार करावा, असा शेवटच्या वाक्यात इशारा देण्यात आला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!