उन्नती महिला प्रतिष्ठानचा सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुर्यकांत किंद्रे यांना जाहिर
भोर : उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित सामाजिक पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत पांडुरंग किंद्रे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिमा विनायक तनपुरे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून मराठी प्रमुख दैनिकांमध्ये वार्ताहार म्हणून समर्पितपणे कार्य करत असलेले सूर्यकांत किंद्रे हे पत्रकारितेचे खरे प्रणेते आहेत. भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी नेतृत्व सांभाळले आहे.
त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, स्थानिक मुद्द्यांवर सजग नजरेने बातम्या त्यांनी केल्या आहेत, यांमधून एक प्रकारे समाजसेवा केली आहे, त्यांचे उल्लेखनीय योगदान सर्वत्र कौतुकाचे ठरत आहे.
जागतिक महिला दिनाचे (८ मार्च) औचित्य साधून तनिष्का व्यासपीठ, मराठा महासंघ (भोर) व उन्नती महिला प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार शंकर मांडेकर व माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील श्रीमंत सौ. गंगूताई पंतसचिव वाचनालय येथे हा गौरव सोहळा संपन्न होईल, असे सिमा तनपुरे यांनी सांगितले.
सुर्यकांत किंद्रे यांच्या पत्रकारितेला नवे परिमाण देणाऱ्या कार्याचा हा गौरव खरंच अभिमानास्पद आहे. स्थानिक पत्रकारितेच्या विकासात त्यांचे योगदान अजरामर राहील.
विलास मादगुडे
पत्रकार, दैनिक सकाळ.




