राजगड तालुक्यातील सुरवड-कोदवडी पूल अखेर कोसळला
वेल्हा : राजगड तालुक्यातील सुरवड-कोदवडी गावांना जोडणारा जुना पूल अखेर कोसळला. स्थानिकांनी अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी करत असुन आज अखेर पूल कोसळल्यामुळे वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे, प्रशासनाने अवजड वाहतुकीस बंदी असल्याचा बोर्ड लावलेला होता तरीही काही अवजड वाहतूक करणारे या आदेशाचे पालन करत नव्हते फुल कोसळल्यामुळे शेतकरी व रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थ भाऊसाहेब दसवडकर म्हणाले, “पूलाची दुरुस्ती अनेक वर्षांपासून मागत आहोत. प्रशासनाने काहीच केले नाही. अवजड वाहतुकीस बंद असा हा पूल तरी आदेशांचे उल्लंघन होत होते. तात्पुरती वाहतूक व्यवस्था करून नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा जनआंदोलन करू.”या घटनेमुळे तालुक्यातील प्रवास कठीण झाला आहे. प्रशासनाच्या गाफिलपणामुळे राजगड तालुका दुर्लक्षित होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. तात्काळ संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.




