आंबेडकरी युवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन ! भोर PSI अनिल चव्हाण विरुद्ध त्वरित कारवाईची मागणी
भोर : भोर तालुक्यातील आंबेडकरी समाजाने भोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्या विरोधात मयूर खुंटेस मारहाण करुन आत्महत्या प्रवृत्त केले असल्याचा गंभीर आरोप असल्याने त्यांना त्वरित अटक करण्यात यावी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी भोरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
PSI अनिल चव्हाण यांच्यावर जातीय द्वेषाने अमानुष शारीरिक मारहाण केल्याचा आरोप आहे. खुंटे यांनी आत्महत्या केली असून त्याच्या सुसाइड नोटमध्येही या मारहाणीतून झालेल्या त्रासाचे उल्लेख त्याने केला आहे, या घटनेमुळे आंबेडकरी समाजात संताप आहे, ज्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्वरित दखल घेण्यासाठी निवेदन दिले आहे.
या निवेदनात PSI अनिल चव्हाण यांना अटक करावी आणि योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आंबेडकरी समाजाशिवाय स्थानिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही या घटनेने खळबळ उडाली असून, न्याय मिळावा या हेतूने नागरिकांनी जोरदार आवाज उठवला आहे.
भोर येथील आंबेडकरी युवकांनी या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून तत्काळ प्रभावी आणि कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. घटनाक्रमाचा निषेध करत, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे, जेणेकरून न्यायालयीन प्रक्रियेत कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये.
या घटनेने सामाजिक शिस्त आणि पोलीस प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, न्याय आणि मनुष्यत्व यासाठी स्थानिक तसेच राज्यस्तरीय पातळीवर दबाव वाढत आहे.




