युवानेते रोहिदास कोंडे यांच्या नेतृत्वात कासुर्डीत शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा ऐतिहासिक उदघाटन सोहळा
शिवापूर (भोर) – २५ नोव्हेंबर २०२५ रोजी कासुर्डी गावात युवासेना सचिव पुणे जिल्हा रोहिदास आबा कोंडे यांच्या पुढाकाराने शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता झालेल्या या कार्यक्रमात तालुका व जिल्हास्तरीय शिवसैनिकांची प्रचंड उपस्थिती होती.उद्घाटन सोहळा आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते संपन्न झाला,
शिवसैनिकांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला तर ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच सौ. सुजाता कोंडे, उपसरपंच अतुल कोडे यांच्या सहकार्याने पाहुण्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. ग्रामसंतोष काका कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वी झाला.
नव्या जनसंपर्क कार्यालयामुळे गावातील सामाजिक-राजकीय कामकाजाला नवी दिशा मिळणार असून, भविष्यातील उपक्रमांना मोठा चालना मिळेल. युवानेते रोहिदास आबा कोंडेंच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाचा काशुरडी गावासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये अदित्य शिरोडकर, प्रकाश भेगडे, अविनाश बलकवडे, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख शैलेश बालगुडे, संघटक माऊली शिंदे, तालुका प्रमुख दशरथ गोळे, जिल्हा युवा सेना प्रमुख आदित्य बोरगे सर्व मान्यवरांनी रोहिदास आबा कोंडे यांना शुभेच्छा दिल्या.




