राजगड कन्या स्वरांगी बोरगेची राज्यस्तरीय झेप ! परिश्रम आणि चिकाटीचं फळ !! MUHS कबड्डी संघात निवड
वेल्हा : राजगड तालुक्यातील कन्या कु. स्वरांगी विलास बोरगे हिने आपल्या परिश्रम, चिकाटी आणि खेळाडूपणाच्या जोरावर महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) राज्यस्तरीय कबड्डी संघात स्थान मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाने राजगड तालुक्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे.
स्वरांगी ही मा. शिवभक्त विलास नाथु बोरगे यांची कन्या असून, लहानपणापासूनच तिला कबड्डीची आवड आणि निष्ठा लाभली आहे. तालुका, जिल्हा आणि विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून तिने आपल्या मेहनतीचा आलेख सतत उंचावला. अखेर तिच्या चिकाटीला राज्यस्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.या यशामुळे राजगड परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
क्रीडाप्रेमी व ग्रामस्थांनी स्वरांगी व तिच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्याकडून आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.




