स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची सर्व प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करा : सर्वोच्च न्यायालय
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकांना घेण्यासाठी जानेवारी २०२६ अखेर पर्यंत मुदत वाढ मिळावी या मागणीचा विंनती अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला होता या अर्जावर मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली त्यामध्ये ३१ जानेवारी २०२६ अखेर पर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार ते पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षणांच्या मुद्यासह इतर अनेक कारणांमुळे रखडल्या गेल्या होत्या, निवडणुकांना दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली. चार महिन्यांच्या आत म्हणजेच ऑक्टोबर २०२५ पर्यंत निवडणुकांशी निगडीत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला मे महिन्यात दिले होते. निवडणुक आयोगाने प्रभाग पुनर्चना, आरक्षण, मतदार याद्या तयार करणे अशी कामे सुरु केली होती. परंतु आयोगाने ईव्हीएम, सण-उत्सव, कर्मचाऱ्यांची कमतरता अशी कारणं राज्याकडून सादर करण्यात आली होती
सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकून घेत, अखेर 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया मतदान व निकालासह पूर्ण करावी, असा स्पष्ट आदेश दिला आहे.