भोर वासियांच्या सेवेत लवकरच नवीन 11 एस.टी.(ST) बस दाखल होणार
भोर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाकडे भोर डेपोसाठी वाढीव बस गेली 5-6 वर्ष सतत मागणी केली जात होती, या मागणीला यश आले आहे लवकरच भोर डेपोत नविन 11 बस दाखल होतील अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे.
Advertisement
संग्राम थोपटे यांनी मागणी पत्रात 20 बसची मागणी केली होती, प्रत्यक्षात नविन 11 बस मिळणार आहेत, लांब पल्याच्या गाड्याची सेवा पुन्हा देता येणार आहे, तसेच डोंगरी भागातील बंद असलेली सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, दुर्गम भागातील गावांना पुन्हा मुक्कामी सेवा देता येणार असल्याने भोर एस. टी (ST) डेपोतील कर्मचाऱ्यामध्ये आनंदी वातावरण आहे.
तसेच तालुक्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक,शाळेतील विद्यार्थी, अतिदुर्गम भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Advertisement




