शिक्षण

विद्या प्रतिष्ठान भोर विद्यार्थांचा दिंडीच्या माध्यमातुन पर्यावरण रक्षणाचा संदेश


भोर: विद्या प्रतिष्ठान भोर शाळेचे विद्यार्थी व बाल वारकरी यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून टाळ,मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष करत दिंडीद्वारे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश दिला.आषाढी एकादशीनिमित्त पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते,यात विद्यार्थी तसेच शिक्षक,कर्मचारी सहभागी झाले होते.
पालखीचे विधीवत पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. हरिनामाचा तसेच टाळ-मृदुंगाचा गजर करीत दिंडीचे प्रस्थान झाले.
नर्सरी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत जनाबाई,संत मुक्ताबाई,या संतांच्या वेशभूषा करत,पालखीचे प्रस्थान करताना विद्यार्थ्यांनी घोषणा देत समाजामध्ये संस्कृती भक्ती, शिक्षण तसेच पर्यावरणाचे रक्षणाचा संदेश दिला,काही विद्यार्थ्यांनी हातामध्ये पर्यावरणाची घोषवाक्य असलेल्या पाट्या तयार करून घोषणा दिल्या. तसेच भारुड, अभंग, विठ्ठल नामाचा जयघोष, फुगड्या विविध कार्यक्रम करत विद्यार्थ्यांनी पालखीचे रिंगण तयार केले. या रिंगणा भोवती चिमुकले विद्यार्थी वारकरी भक्तीने विठ्ठलाचा नाम गजर करत होती.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मराठी विभाग प्रमुख रूपाली नेवसे मॅडम, संगीत शिक्षक निवृत्ती खोपडे सर, क्रीडा शिक्षक संतोष मादगुडे, कलाशिक्षक दत्तात्रय महांगरे सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख रेणुका बांदल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच मराठी शिक्षक वंदना जगताप, संध्या बांदल, रूपाली जगताप शिक्षक कर्मचारी यासर्वांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!