शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना 5 मुलीचा विनयभंग
- भोर : 8 मार्च जागतिक महिलादिनी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी शाळेमध्ये शिबिर आयोजित केले होते,मुलींचे हिमोग्लोबिन तपासणीमध्ये चांगला स्पर्श ( GOOD TOUCH ) वाईट स्पर्श ( BAD TOUCH ) याबाबत ही माहिती दिली असता त्यावेळी काही मुलींच्या लक्षात आले की त्यांना शिकवणारे एक शिक्षक आपल्यातील काही मुलींना रोजच ( BAD TOUCH ) वाईट स्पर्श करत असतात योगायोग शिबिर चालू होण्याच्या अगोदरही काही मुलीना तोच अनुभव आला होता याबाबत मुलींमध्ये चर्चा झाली व त्यांनी ठरवले आपआपल्या पालकांना / घरातील नातेवाईकांना संबंधित शिक्षकाची तक्रार करायची आणि शाळा सुटल्यानंतर मुलींनी त्याच रात्री आपआपल्या पालकांना रोजचे येणारे अनुभव सांगितले, ही माहिती घेतल्यानंतर पालकांनी दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जाऊन संबंधित शिक्षकाला विचारणा करत असताना शिक्षकाने अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली व पालकांशी उद्धटपणे बोलु लागला पालकांनमध्ये महिला ही होत्या महिलांन समोरच गलिच्छ भाषेचा वापर झाल्याने पालक चिडले व त्यांनी त्या शिक्षकास सामूहिक चोप दिला व शाळेतील मुख्याध्यापक लतीफ पटेल यांच्याकडे तक्रार केली व भोर येथे जाऊन पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी कार्तिककुमार धनावडे तसेच तत्कालीन शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे यांच्याकडे तक्रार केली असता संबंधित शिक्षकांला निलंबित केले,
- याबाबत 21 मार्च ला राजगड पोलीस स्टेशन कामथडी येथील पोलिसांनी गुन्ह्याची गंभीर दखल घेत लज्जा उत्पन्न करणे, विनयभंग करणे, दम देणे. बालिकांचे लैंगिक शोषण ( पोस्को ) कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.
Advertisement


