5 नोव्हेंबरला रूपाली चाकणकर मुळशीमध्ये ; शंकर मांडेकर यांच्या प्रचाराच्या फोडणार नारळ
मुळशी : भोर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.मंगळवारी (दि. 5 रोजी) सकाळी 9 वाजता मुळशी तालुक्यातील बेलावडे येथील धावरे बाबा महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ होईल.
Advertisement
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. या प्रचार सोहळ्याला महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिदे गट) आरपीआय (आठवले), इतर घटक त्यांचे नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Advertisement




