सामाजिक

भोर MIDC करिता किरण दगडे पाटलांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे


 

मुंबई: किरण दगडे पाटील यांनी भोर तालुक्यातील रखडलेल्या औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) विषयास चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली, उत्रोली औद्योगिक वसाहती बाबत त्यांना माहिती दिली.

भोर विधानसभा मतदार संघात MIDC मुळे मोठी चालना मिळणार आहे, तसेच भोर तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी असून त्यांच्या हाताला काम मिळण्याची आवश्यकता आहे. अनेक तरुण रोजी-रोटीसाठी मुंबई पुण्या सारख्या शहरात स्थलांतरित होत असून मिळेल ती नोकरी करत आहे. तरुणांच्या बेरोजगारीचा थेट परिणाम कौटुंबिक व्यवस्थेवर होत असून हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न गेली कित्येक वर्ष तसाच प्रलंबित असून हा लवकरात लवकर लावावा अशी कळकळीची विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री यांना केली.

Advertisement

भोर मध्ये एमआयडीसी होण्यासाठी स्थानिक नागरिक व्यापारी लहान मोठे उद्योजक यांच्याकडून अनेक वर्षापासून या मागणीला मागणी होत आहे एमआयडीसीमुळे भोर तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार असून या भागातील बेरोजागर तरूण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच भोर शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठ, वाहतूकीस, व्यापारी, लहान-मोठे उद्योग यांनादेखील चालना मिळणार आहे.

एक प्रकारे भोर तालुक्यात औद्योगिक क्रांती घडून येईल, या दृष्टीने येथे औद्योगीक वसाहतीस (MIDC) चालना मिळायला हवी अशी मागणी केली. या प्रश्नावर लवकरच सकारात्मक पावले उचलू असा शब्द किरण दगडे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!