खडकवासला विधानसभा मतदारसंघात आर.पी.आय(आठवले) तटस्थ राहणार : प्रवीण ओव्हाळ
खडकवासला : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ व महायुतीमध्ये पक्षाला व अबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्यामुळें महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार न करता तटस्थ राहण्याचे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांनी केले.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आवाहनानंतरही पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदार संघात प्रवीण ओव्हाळ व त्यांच्या सहकारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकी संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी हॉटेल स्वर्णा वडगाव येथे मिटिंगच्या आयोजन केले होते,
महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये एकही जागा न सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, 211खडकवासला मतदारसंघांमधील विविध विषय तसेच खडकवासला मतदार संघात महायुती ने रिपब्लिकन पक्षाला विश्वासात न घेतल्यामुळे सर्वानुमते तटस्थ राहण्याची भूमिका या मिटिंगमध्ये घेण्यात आली,यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल दादा कांबळे,खडकवासला मतदारसंघातील RPI च्या ज्येष्ठ नेत्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष संगीताताई आठवले,मातंग आघाडी संघटक सचिव प महा दत्ताभाऊ चव्हाण,खडकवासला विधानसभा मतदार संघ महिला आघाडी अध्यक्ष प्रभाताई कांबळे,श्रमिक ब्रिगेड सचिव सुभाष सहजराव,श्रमिक ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष किशोर पंडागळे, खड़कवासला युवक अध्यक्ष कुणाल सरोदे, खड़कवासला कार्याध्यक्ष निलेश आगळे, पुणे जिल्हा नेते बाळासाहेब साळवे,वाहतूक आघाडी पुणे जिल्हा उपध्यक्ष राजकुमार डांगे, आकाश ऊर्फ मुन्ना गायकवाड आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




