सरपंच पकंज गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कामथडी गणामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन
भोर : कापूरहोळ गावचे सरपंच व कामथडी पंचायत समितीच गणातील इच्छुक उमेदवार पंकज गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले त्यामध्ये कापूरहोळ (ता. भोर) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामदेवी जानुबाई मंदिरामध्ये करण्यात आले होते, या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एकूण ५४ युनिट रक्त संकलित झाले. कापूरहोळ गावातील तरुण, महिला, प्रतिष्ठित नागरिक, ऑटो-टॅक्सी चालक संघटनेचे सदस्य आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नसरापूर यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली.
मानवाने विज्ञानातील प्रगतीच्या जोरावर सर्व काही साध्य केले आहे. परंतु मानवाला अजुनही रक्तनिर्मिती करता आलेली नाही. अशातच राज्यात तसेच जिल्ह्यात सतत रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याची परिस्थिती लक्षात घेता सरपंच पंकज गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि.१ सप्टेंबर) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून वाढदिवसानिमित्त हे सामाजिक कार्य होत असल्याने सर्व स्तरांतून या शिबिराचे स्वागत होत आहे. रक्तदात्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. शिवाय सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नसरापूर यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आली, रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी पुढाकार घेतला होता.
तसेच पुढील उपक्रम राबविले गेले.
• पुणे जिल्हा प्राथमिक शाळा कापूरहोळच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
• माऊली अनाथ आश्रम माळेगाव ता.भोर, येथील मुलांचे जेवणाचे नियोजन करण्यात आले होते.
• मूकबधिर विद्यालय भोर येथील विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तू जेवणाचे साहित्य देण्यात आले.
• गरजु शेतकऱ्यांना औषध फवारणी डबल बॅटरी पंप ५० टक्के सवलतीच्या दरात देण्यात आले.
यावेळी युवा नेते पृथ्वीराज थोपटे, सरपंच पंकज गाडे, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. मंगेश सरपाले, चेअरमन दत्ता बाठे, म्हस्कोबा गाडे, विशाल दळवी, विकास गाडे, सागर गाडे, संग्राम गाडे, अभी गाडे, अक्षय गाडे, श्रीकांत गाडे, गणेश जाधव, अजय गाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.




