शिक्षण

समग्र शिक्षा योजनेत भोर तालुक्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवेत कायम करण्यासाठी काम बंद आंदोलन


भोर : भोर दि. 7 मार्च 2025 (शुक्रवार) राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत महत्वाचा वाटा असतानाही राज्यशासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षाचे बळी ठरलेल्या समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई स्थित आझाद मैदान येथे राज्यातील समग्र कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे. या आंदोलनाला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला असून तालुक्यातील इतर कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत, समग्र शिक्षा अभियानातील सन 2002 पासून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी समग्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी 4 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Advertisement

शिक्षण विभागातील अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम केले असताना याच विभागातील एमए बीएड, एमएससी, नेट, सेट, पीएचडी धारक, असे कर्मचारी काम करतात. तसेच यामध्ये तालुका समन्वयक, कनिष्ठ अभियंता, लेखनिक, लिपिक, विषयतज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस को ऑर्डिनेटर इत्यादी कर्मचारी काम करतात. या कायम न केलेल्या कर्मचाऱ्यांनी 4 मार्चपासून मुंबई येथे काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

शिक्षण विभागात सध्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) प्रवेश प्रक्रिया चालु असुन काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शालांत परीक्षा, मार्च एंडिंगची ऑफिशियल कामे, संयोजनाची कामे इत्यादी महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्यामुळे हे आंदोलन लांबल्यास शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने शासनाकडून उपोषणकर्त्यांना आशा आहे की त्यांच्या मागणीचा योग्य विचार करून शासन निर्णय घेईल, शासनाच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्यभरातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!