संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी श्री क्षेत्र बनेश्वर येथे केला अभिषेक
नसरापूर : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध देवतांना विविध स्तोत्र म्हणत स्नान घालतात म्हणजेच अभिषेक करतात, अभिषेक करणे हे मोठे पुण्यदायी काम आहे, इच्छित मनोकामना पूर्ण करणारे कर्म आहे,
काहीजण घरातील कुलदेवतांना ठराविक दिवशी अभिषेक करत असतात.पुर्वीपासुन शुभकार्याकरिता इच्छित देवी-देवतांना अभिषेक करायचे कारण अभिषेक करणे विशेष पुण्यकारक समजले जाते.
महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नसरापूरच्या श्री क्षेत्र बनेश्वर येथे अभिषेक करुन आशिर्वाद घेतले.
यावेळी संग्राम थोपटे समवेत पै.सुनिल थोपटे, लहुनाना शेलार, शिवनाना कोंडे, मदनअण्णा खुटवड, पोपटराव सुके, धनंजय वाडकर, शैलेश सोनवणे, राहुल लेकावळे, बाबुशेट झोरी, लालू शेठ कोंडे, दत्ता कोंडे, इरफान मुलाणी, मंदिर समितीच्या अध्यक्षांसह सभासद तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.




