क्राईम

राजगड पोलिसांची धडक कारवाई ! मटका जुगार अड्ड्यावर छापा !! ८ जण ताब्यात


खेडशिवापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवापूर बागेतील कोंढणपुर फाटा येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्यावर राजगड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. या संयुक्त कारवाईत ८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम १५२२०/-  रुपये व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आणखी तिघेजण फरार झाले आहेत. मंगळवार दि. ७ ऑक्टबर सायंकाळी ६:४५  वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पोलिसांना गुप्त बातमीदराने खेडशिवापूर ग्रामपंचायत हद्दी मधिल मुक्तांगण हॉटेल च्या बाजुला, कोंढणपुर फाटा परिसरात बेकायदेशीर मटका जुगार सुरू असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. सदरची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून करवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या, त्यानुसार पोलीस पथकाने सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या मारास सदर ठिकाणी छापा टाकून ८ जणांना ताब्यात घेतले.

Advertisement

राजगड पोलीस स्टेशनचे अक्षय सुभाष नलावडे यांनी आरोपी १) अंकुश रामचंद्र आखाडे वय ४२ वर्ष रा. भेलकेवाडी ता. भोर, जि. पुणे २) गणेश कोंडे ३) राजू कोंडे ४) भाऊ पंढरी गवळी वय ५० वर्ष रा. शिवाजीनगर वस्ती, ता.हवेली,जिल्हा पुणे ५)  सुखदेव भीमराव ढेंबरे वय ७५ वर्ष बावधन, पुणे ६) संतोष भजनदास तांबे वय ४६ वर्ष रा. धायरी फाटा, तालुका हवेली, जिल्हा पुणे ७) सुरज जयसिंग पाटील वय ३० वर्ष रा. संतोष नगर, कात्रज, पुणे ८) करण जितेंद्र मोदी वय वर्ष ३१ रा. कात्रज, पुणे. या आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर राजगड पोलीस स्टेशन मध्ये गु. र. नं. ३६५ / २०२५ महाराष्ट्र व्यवहार प्रतिबंध अधि कलम -१२ (अ) अंतर्गत कोणत्या गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

राजगड पोलिसांनी एकूण १५ हजार २२० रुपयांचे रोखड, कल्याण मटका बाजार कॅल्क्युलेटर, ६ पावती पुस्तके हे जुगार खेळांचे साहित्य सापडले असुन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी प्रमिला निकम या करत आहेत.

 

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!