मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे, मला एकदा संधी द्या : कुलदीप कोंडे
भोर : 203 भोर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी भव्यदिव्य सभेचे आयोजन भोर येथील R.R. कॉलेजच्या मैदानावर केले होते, यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो जनतेच्या साक्षीने त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
कुलदीप कोंडेनी आपल्या भाषणात गुंजवणी, वाजेघर उपसा सिंचन योजना, शिवगंगा उपसा सिंचन योजना, भोर राजगड(वेल्हे) मुळशी तालुक्यातील तरुणांना रोजगार देण्याच फक्त आश्वासन दिले जाते, शेतकऱ्यांच्या पोरांना शेतीची आवड का निर्माण होत नाही, तर शेतीसाठी पाणी आणि रस्ता उपलब्ध करून दिला जात नसल्याने ही कामे लोकप्रतिनिधीची आहेत, एखादे काम रखडले की पवार कुटूंब आणि विरोधकावर आरोप करायचे आणि चांगले असले की आपण स्वतःला कार्यसम्राट आमदार बोलायच, विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर भोर विधानसभा मतदारसंघ मागासलेलाच आहे.
गेली 15 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, विकास का झाला नाही, थोपटे साहेबांनी संस्था उभ्या केल्या त्या सुध्दा तुम्हाला टिकवता आल्या नाही, आणि सांगतात कार्यसम्राट आमदार, कायम जनतेला फसवल आहे, आम्ही जनतेला फसवणार नाही, मला निवडून द्या 1 वर्षात एमआयडीसी मंजुर करुन घेणार, नाही घेतली तर माझ्या वडिलांचे नाव लावणार नाही, त्यासाठी मतदारांनी परिवर्तनासाठी सज्ज राहून अपक्ष उमेदवार म्हणून मला मतदान करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी मतदारांना केले.
याप्रसंगी आदर्श माजी नगरसेवक राजाभाऊ पासलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, व्यखाते अर्चना भोर कारंडे, गणेश धुमाळ, पूनम पांगारे, माजी उपसभापती अमोल पांगारे राजगड तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दत्ताभाऊ देशमाने शिवसेनेचे कार्यकर्ते प्रशांत दानवले, सचिन बांदल भोर तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र भोरडे,, प्रहार उपाध्यक्ष अजय कांबळे, राकेश गाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक बर्डे, विलास बापू मरळ, नारायण काका कोंडे, विकास चव्हाण,काळूराम भगत, रुपेश भगत , महेश कोंडे, वासुदेव कोंडे, बाळासाहेब जायगुडे, दत्तात्रेय खुटवड, डॉ. अतुल जाधवराव, स्वाती जाधवराव, संग्राम कोंडे अमोल कोंडे राजगड मुळशी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कोंडे सूत्रसंचालन सुरज जगताप यांनी केले.




