राजकीय

भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न ! निवडणुकीची जोरदार तयारी


वसंत मोरे,
प्रतिनिधी.

भोर : भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकर्ता आढावा बैठक भोर शहरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.विजयदादा कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडली. संसदरत्न खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती,

जिथे पक्षातील नवे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा संदेशबैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी आपली मनोगते व्यक्त केली.
• वेळू-नसरापूर गट
१) गणेश खुटवड २) गणेश बागल
• कामथडी-भोंगवली गट
१) वैभव धाडवे,
• शिंद-भोलावडे गट
१) मानसिंग बाबा धुमाळ
• उत्रौली-कारी गट
१) संदीप नांगरे २) विलास शिवतरे या नामांकित व्यक्तींची नावे पुढे आली आहेत.
पंचायत समिती गण व इच्छुक उमेदवार वेगवेगळया गटांतून प्रबळ इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीचा दावा बैठकीत मांडला.

Advertisement

भोर नगराध्यक्षपदासाठी नाव निश्चित पक्षाच्या वतीने विद्यमान नगराध्यक्ष मा. विठ्ठल शिंदे यांचे नाव प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले.
यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची संघटन व नेतृत्व बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व संवाद
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व संवादया बैठकीस भोर तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल, भोर शहर महिलाध्यक्षा हसिना शेख, किसान सेल अध्यक्ष शिवाजी वाडकर, अभियांत्रिकी सेल अध्यक्ष कुणाल साळवी, तसेच ताराचंद खोपडे, विकास कुमकर, गिरीष निगडे, मयूर निगडे, ओंकार गोसावी, सागर कोंडे, भूषण गोगावले, अनिल पवार, महेंद्र ओसवाल, सारंग शेटे, किसन चोरघे, राजू शिंदे, समीर घोणे, निहाल शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावी दिशा आणि संघटनया बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले, तसेच आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक बळकटपणावर भर देणारे मार्गदर्शन झाले. पक्षाचे वरिष्ठ मार्गदर्शक, जिल्हाध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनांनुसार संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट निवडणुकांना तयारीसाठी सज्ज झाला असून या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेद व प्रेरणेचा संचार झाल्याचे दिसून आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!