राजकीय

जीवन कोंडे यांची वेळू-नसरापूर गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी


 

नसरापूर : भारतीय जनता पक्षाचे माजी भोर तालुका अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून ओळखले जाणारे जीवन कोंडे यांनी आपल्या कार्यकाळात भोर तालुक्यात विकासाची नवी परंपरा निर्माण केली आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करत विविध पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि शेती या क्षेत्रांत लक्षवेधी प्रकल्प राबवले आहेत.

भोर तालुक्यातील चार ही जिल्हा परिषद गटातील विकासासाठी जीवन कोंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 3054 आणि 5054 अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून रस्ते बांधकाम, समाजमंदिर उभारणी आणि जनसुविधा योजनांना गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेत त्यांच्या प्रभावा खालील चारही गटांमध्ये त्यांनी सातत्याने काम करून मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. प्रत्येक गटात त्यांचे अडीच ते तीन हजार वैयक्तिक मतदारांचे जाळे असून कार्यकर्त्यांना त्यांनी नेहमीच पाठबळ आणि मदत केली आहे. त्यांच्या उमेदवारीचा परिणाम चारही जिल्हा परिषद गटामध्ये होवू शकतो असे जाणकारांचे मत आहे.

Advertisement

ग्रामीण पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेल्या असून तळागाळातील लोकांना स्वच्छ पाणी मिळू लागले आहे. शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणाची सोय, ओपन जिम तसेच महिला बचतगटांना आर्थिक बळकटी देण्याचे उपक्रम हे त्यांच्या कार्याचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.स्थानिक पातळीवर जनतेशी असलेला त्यांचा दुवा हा त्यांच्या लोकप्रियतेचा मुख्य आधार मानला जातो.

जीवन कोंडे यांनी वेळू-नसरापूर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या इच्छेमुळे स्थानिक पातळीवर नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांना व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.

जीवन कोंडे यांच्या नेतृत्वाखाली वेळू-नसरापूर गटाचा विकास अधिक वेगाने होईल असा विश्वास स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.भाजपच्या कार्यकत्यांमध्ये कोंडे यांचा अनुभव व मैदानातील संपर्क या दोन्हींचा अनुभव निवडणुकीतील महत्त्वाचा घटक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा परिषदेत भोर तालुक्याचा आवाज ठामपणे उठविण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!