ताज्या घडामोडी

राजगड पोलिसांची धडक कारवाई ! गाऊडदरा येथील अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश !! १९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


खेडशिवापूर : पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थांविरोधात राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने गाऊडदरा येथे मोठी कारवाई केली. गांजा व हाशिशसदृश पदार्थांच्या विक्रीचा धंदा उघडकीस आला असून, पुष्पा शिंदे (रा. गाऊडदरा, ता. हवेली, जि. पुणे) व तिच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

संशयास्पद हालचालींची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलिसांनी सापळा रचला. कारवाईत आरोपींच्या ताब्यातून चार गांजाच्या पुठ्ठ्या व हाशिशसारख्या तपकिरी पदार्थाने भरलेले तीन बॉक्स जप्त झाले. बॉक्समध्ये ३५ लहान डबे असून, प्रत्येकी अंदाजे ५०० रुपयांचा माल होता. एकूण मुद्देमालाची किंमत १९,५०० रुपये इतकी आहे.

महिला पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम यांच्या फिर्यादीवरून २४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदवला गेला. तपास पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करीत असून, पी.आय. राजेश गवळी मार्गदर्शन करत आहेत.

 

 

 

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!