ताज्या घडामोडी

राजगड पोलिसांची दमदार कामगिरी ! ट्रकमधून जाणारा ६१ लाख रुपयांचा गुटखा जप्त


नसरापूर : दि. २२ (सोमवार)  शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा घेऊन जाणारा आयशर ट्रक राजगड पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने पुणे-सातारा हायवेवरील शिवरे गावच्या हद्दीतील हॉटेल राजस्थानी ढाब्याजवळ अवैध गुटख्याने भरलेला ट्रक (MH04 JU,1139) उभा असल्याची गोपनीय माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन कारवाई करत असताना ट्रक चालकांनी योग्य माहिती न दिल्याने व ट्रकमधुन उग्र स्वरूपाचा वास येत असल्याने ट्रक राजगड पोलिस स्टेशनला नेण्यात आला.

यावेळी कॅमेऱ्यासमोर व २ पंचाच्या उपस्थितीत ट्रकची तपासणी करण्यात आली असता ट्रकमध्ये किंमत ५१, २७,८४०/- रूपये रजनीगंधा पान मसाला नावाच्या गुटख्याची ३५ पोती व ट्रकची किंमत १०,००,०००/- असा एकुण ६१,२७,८४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रकचा चालक आश्विनकुमार त्रिपाठी मुळ उत्तरप्रदेशातील असुन तो सध्या मुंबईमध्ये राहत आहे. त्याच्यावर अवैध्य गुटखा वाहतुक प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३५५/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

चालकाने हा ट्रक कोठे भरला इतका भरलेला ट्रक कोणासाठी, कोणत्या ठिकाणी घेऊन चालला होता याबाबत पुढीत तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील हे करत आहेत.

सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक सो, संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड राजेद्रसिंह गौर, राजगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड कार्यालया कडील पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे, पो.ना दत्तात्रय खेगरे, पो.शि. योगेश राजीवडे तसेच राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपिनिरीक्षक अजित पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रर्मिला निकम, पोलीस अंमलदार अक्षय नलावडे, मंगेश कुभांर, अजय चांदा यांनी केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!