सामाजिक

महात्मा गांधी जयंती निमित्त कापूरहोळ ग्रामपंचायतीचे विविध उपक्रम, स्वच्छता हीच खरी सेवा : उपसरपंच पंकज गाडे


कापूरहोळ : दि. 2/10/24 (बुधवार) रोजी सकाळी 11:00 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 155 वी जयंती कापूरहोळ ग्रामपंचायतीने विविध उपक्रम घेऊन साजरी केली. ग्रामदैवत जानुबाई मंदिरामध्ये महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे सरपंच सौ. मंगल गाडे, उपसरपंच पंकज गाडे यांच्या हस्ते पूजन करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

ग्रामपंचायत अधिकारी एस.एन.वाकळे यांनी उपस्थितांना स्वच्छते विषयी सांगताना घाणेरडे वातावरणामुळे रोग आणि दुःख वाढते, स्वच्छ परिसर आरोग्य आणि आनंद निर्माण करतो, स्वच्छता ही गरिबांचे शस्त्र आहे, सर्व सद्गुणांचे इमले त्यावर उभे राहतात तो पाया म्हणजे स्वच्छता, तुमचा परिसर, गाव, सोसायटी, कॉलनी स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले.

यावेळी सरपंच सौ.मंगल गाडे, उपसरपंच पंकज ऊर्फ बाबी गाडे,  विद्यमान सदस्य गुलाब ऊर्फ बंडु गाडे, अजित शेख, रोहित जगताप, सौ.विनया सपकाळ, सौ.सविता गाडे, सौ.शोभा गाडे, सौ.प्रज्ञा मस्के, संगणक परिचारिका सौ.सुप्रिया बांदल, लेखनिक सौ.शुभांगी धुमाळ, आकाश गाडे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील मान्यवर वि.वि.कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन वसंत गाडे, दशरथ गाडे, संदीप गाडे, देविदास जगताप, चंद्रकांत दळवी उपस्थीत होते,

Advertisement

स्वराज महाराष्ट्र न्यूजशी विविध विषयावर बोलताना उपसरपंच पंकज गाडे यांनी कापूरहोळ ग्रामस्थ तसेच गावाला लागुन आसलेल्या सोसायटी, कॉलनी मध्ये वास्तव्य करणाऱ्या स्थानिक व बाहेरील लोकांना आपला परिसर, आपले गाव स्वच्छ ठेवा, तसेच आपण स्वतः कचरा आजूबाजूला टाकणार नाही आणि इतरांनही टाकू देणार नाही, आपण स्वतः माझे कुटुंब, माझा परीसर, माझी सोसायटी, माझी कॉलनी माझा गाव अशा ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा, तसेच महात्मा गांधी जयंती असल्याच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेचा उपक्रमातील एक भाग म्हणून आज गावातील ग्रामस्थ तसेच गावाच्या आजूबाजूचे रहिवाशी यांना मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे, 23 सप्टेंबरला आम्ही कचरा गाडी चालु केली असून कचरा टाळण्याकरिता त्या गाडीचा जास्तीत-जास्त उपयोग करावा अशी विनंती त्यांनी रहिवाशांना केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!