सामाजिक

भोरमध्ये विद्यार्थ्यांसह पालकही रडले ! आई-बाप समजून घेताना डॉ. वसंत हांकरे यांचे अप्रतिम व्याख्यान


वसंत मोरे,
प्रतिनिधी.

भोर : पृथ्वीराज थोपटे युथ फाउंडेशनच्या वतीने मंगळवार ९ सप्टेंबर रोजी सह्याद्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात व्याख्याते प्रा. वसंत हंकारे “आई-बाप समजून घेताना” या विषयावरील व्याख्यान झाले, सध्याच्या युगात आईच्या यातना व बापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आई-वडिलांचा श्वास नेहमी हदयात ठेवावा. मुलगा किंवा मुलीचे वाकडे पाऊल पडले, तर अंत्यसंस्काराच्या चितेवर जाण्यापूर्वीच बापाची घरात आणि मनात रोजच चिता जळत असते, असे विचार प्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजगड ज्ञानपीठ भोरच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे होत्या.

डॉ. वसंत हंकारे यांनी पुढे सांगितले की कोणत्याही मुलीने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये, जिवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांची मान खाली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. आई-बापासारखे खरे प्रेम आपल्यावर जगात कोणीच करू शकत नाही. मुलांना घडविण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला ‘बाप’ ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करीत असतो. स्वतः फाटके कपडे घालून मुलांना ब्रेन्डेड कपडे देणारा बापच असतो. बापाची किंमत काय असते, हे अनाथाश्रमातील मुलांना विचारा, असेही हंकारे म्हणाले.

Advertisement

आई-वडील समजून घेताना तसेच निर्व्यसनी जीवनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. या उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकासह उपस्थित डसा-डसा रडले,    या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे पृथ्वीराज थोपटे युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे भोर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास राजगड ज्ञानपीठ भोरच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, युवा नेते पृथ्वीराज थोपटे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर पंचायत समितीचे मा.सभापती लहूनाना शेलार, भोर नगरपरिषदेच्या नगरसेविका रुपाली कांबळे, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, भोर बाजार समितीचे संचालक प्रवीण शिंदे, राजेंद्र शेटे, तुषार सणस, रोहित शिंदे , लालु कोंडे, नरेश चव्हाण, रविंद्र कांबळे, अशोक वाडकर, दिपक कुमकर, विठ्ठल खोपडे यांच्यासह राजा रघुनाथराव विद्यालय, आनंदराव थोपटे महाविद्यालय व जनरल कॉलेजचे विद्यार्थी  पृथ्वीराज थोपटे युथ फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!