ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील वडतुंबी (तांबटवाडी) येथे विविध विकासकामांचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते उद्घाटन


 

भोर : भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते व ग्रामस्थ मंडळ वडतुंबी (तांबटवाडी) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा भव्य उत्साहात पार पडला. त्यांच्या सोबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी जि.प. सदस्य भिकू अण्णा निगडे, सरपंच प्रवीण जगदाळे व अविनाश गायकवाड उपस्थित होते.

आमदार मांडेकर प्रथमच वडतुंबीत दाखल झाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे रथातून ढोल-ताशा, गजर व तुतारीच्या निनादात स्वागत केले. दोन जेसीपीनमधून पुष्पवृष्टी करून भव्य मिरवणुकीत ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

Advertisement

ग्रामस्थांनी या वेळी गावातील विकासकामांची मागणी मांडली. त्यात शिवनगरी येथे व्यायामशाळेची इमारत, आंबेडकर नगरातील समाजमंदिराचे उर्वरित काम, गावठाणातील पाटील आळीत सांस्कृतिक भवन बांधणी, तसेच तांबटवाडीतील दत्तमंदिर शेजारील सांस्कृतिक भवन पूर्ण करणे आणि पाणी साठवणुकीसाठी लहान बंधारे उभारण्याची मागणी करण्यात आली. आमदार मांडेकर यांनी सर्व प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचा शब्द दिला.

कार्यक्रमात रणजीत शिवतरे यांच्या कामामुळे प्रभावित होऊन वडतुंबी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सरपंच सुवर्ण निगडे, उपसरपंच पांडुरंग साळेकर, सदस्य संतोष साळेकर, रंजना साळेकर, दीप्ती जेधे, तसेच सोपान नवघणे, राजेंद्र निगडे, आनंदा साळेकर,सोपान निगडे, दत्ता निगडे, रवींद्र साळेकर, पोलीस पाटील अशोक साळेकर आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!