ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात अनुसूचित जातींचे आरक्षण न मिळाल्याने आंबेडकरी चळवळ आक्रमक


 

भोर : ता. ६ नोव्हेंबर – भोर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणांपैकी कोणत्याही गटात अनुसूचित जातींसाठी आरक्षण न निघाल्यामुळे स्थानिक आंबेडकरी समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तालुक्यात अनुसूचित जातींची ओळखण्याजोगी संख्या असतानाही त्यांना प्रतिनिधित्व न मिळाल्याने सामाजिक न्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेळू गणातून आंबेडकरी चळवळीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे.

Advertisement

सुनील गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून या भागात सामाजिक न्याय, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर काम करत असून, समाजातील तळागाळातील समस्यांना आवाज देत आले आहेत.गायकवाड यांच्या मते, अनुसूचित जातींसाठी आरक्षण मिळाले नाही म्हणून निवडणुकीपासून दूर बसणे उचित नाही. ‘‘आमच्या समाजाची ताकद दाखवून योग्य उमेदवार देऊन आम्ही निवडणूक लढविणार आहोत,’’ असे ते म्हणाले. त्यांच्या निर्णयाचे तालुक्यातील अबेडकरी जनतेने स्वागत केले असून, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान स्थानिक राजकीय वर्तुळात गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे वेळू गणातील निवडणूक चुरशीची होण्याची चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षांचे लक्ष आता या गणाकडे केंद्रित झाले आहे. सामाजिक न्यायाच्या पायावर उभी राहणारी ही निवडणूक भोर तालुक्याच्या राजकीय समीकरणात महत्त्वाचा टप्पा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!