ताज्या घडामोडी

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते प्रतिक भेलकेला महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार ! बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे भोरचा सुपुत्र सन्मानित


पुणे : भोर तालुक्यातील प्रतिक राजेंद्र भेलके यांना प्रोवेन पथवे संस्थेकडून बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता हमी आणि अंमलबजावणी गतीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी (१२ एप्रिल) पुण्यातील हिंजवडी येथे लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुण्याचे नगरसेवक संतोष शिंदे उपस्थित होते.

Advertisement

हिर्डोशी येथील सुपुत्र असलेले प्रतिक भेलके सध्या भोरमध्ये स्थायिक आहेत. ते पुण्यातील प्रेस्टीज बिल्डकॉन असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत इंजिनिअर झालेले भेलके यांनी जिद्द, प्रामाणिकपणा आणि अथक परिश्रमाने बांधकाम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गुणवत्तेवर ठाम विश्वास आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर खरे यश मिळते, हा संदेश त्यांनी आपल्या कारकिर्दीतून दिला आहे. त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पुरस्कारानंतर बोलताना भेलके म्हणाले, “यश मिळवण्यासाठी मोठ्या शहरातून किंवा श्रीमंत पार्श्वभूमीतून येणे आवश्यक नाही. स्वतःवर विश्वास, सतत शिकण्याची तयारी आणि मेहनत असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशातून खचून न जाता प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. ग्राहकांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. आम्ही दर्जेदार काम, पारदर्शकता आणि वेळेचे पालन यावर भर देत राहू.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!