ताज्या घडामोडी

भोर येथील पिराच्या मळ्यात टेम्पोने चिरडले बहीण-भाऊ ! ८ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू !! ६ वर्षीय भाऊ गंभीर जखमी


भोर : भोर शहरालगत पिराच्या मळ्यात शुक्रवार दि. २० रोजी घरासमोर झाडाखाली खेळणाऱ्या दोन लहान भावंडांना (एमएच १२ वायबी ९२७९) भरधाव कॅरी टेम्पोने जोरदार धडक देऊन चिरडले. यात ८ वर्षीय पायल राधेश्याम भारतीचा जागीच मृत्यू झाला, तर ६ वर्षीय भाऊ लवकुश राधेश्याम भारती गंभीर जखमी झाला. पाय मोडून डोक्याला मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Advertisement

पीडित कुटुंब पिराच्या मळ्यात खासगी कंपनीत काम करणारे राधेश्याम भारती सध्या राहणार पिराचामळा, ता. भोर. मुळगाव उत्तर प्रदेश यांच्या मुलगी पायल व मुलगा लवकुश रस्त्याच्या कडेला घरासमोर सावलीत खेळत होते. अचानक आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने पायल टेम्पोखाली सापडली. दोघांनाही तात्काळ दवाखान्यात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच पायलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित वाहनचालकावर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन मुलीचा मृत्यू समजताच आई-वडील व नातेवाईकांनी भोर पोलीस स्टेशनसमोर मोठा आक्रोश केला. घटनेचा पुढील तपास पी.आय. आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!