ताज्या घडामोडी

ग्रामपंचायती निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर ! तहसीलदारांना २० फेब्रुवारीपर्यंत नकाशे अंतिम करण्याचे आदेश


मुंबई :  दि. १७ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला. आदेश क्रमांक ग्रापनि-२०२५/प्र.क्र.१३१/ई-१४०९६२३/पं.रा.-२ नुसार, तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून २० फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग सीमा निश्चित कराव्यात, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने (गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी समाविष्ट) ५ मार्चपर्यंत प्रारूप तपासावे, ११ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे. जिल्हाधिकारी १७ मार्चपर्यंत तपासणी करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील, जे ३० मार्चपर्यंत मान्यता देईल. हरकतींसाठी ७ एप्रिलपर्यंत जाहिरात, १६ एप्रिलपर्यंत सुनावणी व २३ एप्रिलपर्यंत अंतिम निर्णय. जिल्हाधिकारी ४ मेपर्यंत अंतिम प्रभागरचना (नमुना अ) प्रसिद्ध करतील.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १० नुसार हे निर्देश जारी. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी (मुंबई वगळून) व राज्य निवडणूक आयोगाला प्रत अग्रेषित. निवडणूक प्रक्रिया सहा महिने आधी सुरू होईल

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!