क्राईम

वेळूतील समृद्धी लॉजवर AHTU ची धडक कारवाई ! अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश !! सहा महिलांची सुटका


खेडशिवापूर (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील वेळू गावात अवैध वेश्या व्यवसायाच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) शनिवारी रात्री उशिरा समृद्धी लॉजवर धडक कारवाई केली. या मोहिमेत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून तीन संशयितांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आह

याप्रकरणी तीनजणांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी असे गैरकृत्य रोखण्यासाठी नियमित देखरेख वाढविण्याची मागणी केली आहे.

Advertisement

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजवर चालणाऱ्या संशयास्पद हालचालींची माहिती AHTU ला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.सुटवलेल्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करून आवश्यक समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अशा अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

या धाडसी मोहिमेने पुन्हा एकदा मानवी तस्करीविरोधातील लढाईकडे समाजाचे लक्ष वेधले असून ग्रामीण भागातील लॉज व रिसॉर्टमधील बेकायदेशीर हालचालींवर पोलीस विभागाने दक्ष राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!