ताज्या घडामोडी

दिवळे गावचा लौकिक उजळला ! अमित बाठे यांची आयर्नमन मलेशिया स्पर्धेत अफलातून कामगिरी


 

कापूरहोळ : भोर तालुक्यातील दिवळे गावचा सुपुत्र अमित पांडुरंग बाठे यांनी मलेशियामध्ये पार पडलेल्या जागतिक दर्जाच्या ‘आयर्नमन’ स्पर्धेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. जगातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अमित यांनी अवघ्या अकरा तासांत सर्व टप्पे पूर्ण करत 14 वा क्रमांक पटकावला. त्यांच्या या कामगिरीने दिवळे गावचा तसेच महाराष्ट्राचा लौकिक उजळला आहे.

‘आयर्नमन’ स्पर्धा ही शारीरिक आणि मानसिक क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर मॅरेथॉन धावणे हे तिन्ही प्रकार सलगपणे पूर्ण करावे लागतात. जगभरातील शेकडो नामांकित खेळाडूंमध्ये अमित यांनी दिलेला झंझावाती परफॉर्मन्स खास ठरला. त्यांनी दाखवलेली जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास या यशामागील आधारस्तंभ ठरले आहेत.

Advertisement

अमित यांच्या यशाबद्दल संपूर्ण भोर तालुका आणि दिवळे गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे तरुण पिढीला नवीन प्रेरणा मिळाली आहे. “जिद्द आणि सातत्य असल्यास काहीही अशक्य नाही,” हे अमित यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या या पराक्रमाने भारताच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद पानाची भर पडली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!