भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीस पदी दिपक तनपुरे यांची निवड
पुणे : भारतीय जनता पार्टीची पुणे जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दिपक तनपुरे यांची पुणे जिल्हा चिटणीस पदी नेमणूक करण्यात आली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, व जिल्हा समन्वयक आमदार राहुल कुल यांच्या मान्यतेनूसार भाजपा पुणे ग्रामीण दक्षिण विभागाच्या नूतन जिल्हा पदाधिकारी यांची यादी घोषित करण्यात येत आहे. दिपक ज्ञानेश्वर तनपुरे यांनी भोर तालुक्यामध्ये भाजपा पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांना ही पक्ष श्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. तनपुरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगले काम केले आहे.
दिपक तनपुरे म्हणाले की आपण यापूर्वी भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी गावागावात काम केले आहे येणाऱ्या काळात याही पेक्षा अधिक काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच त्यांना ही संधी दिल्याने त्यांनी दक्षिण प्रभारी डॉ. प्रविण दबडघाव, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार संग्राम थोपटे, बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, संतोष धावले, सुनिल पांगारे या सर्वांचे आभार मानले.




