क्राईम

पंढरपुरला दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावुन बलात्कार


कृष्णा सुतार,
प्रतिनिधी.

दौंड : पंढरपूरला देवदर्शनसाठी जात असलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असुन काही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले असुन दोन अज्ञात व्यक्तींच्या नावाने दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितनुसार दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पुणे सोलापूर महामार्गाला लागून असणाऱ्या एका टपरी जवळ पीडित कुटुंब चार चाकी वाहनातून काही महिला व पुरुष चहा पिण्यासाठी या ठिकाणी थांबले होते. यावेळी दोन अज्ञात इसम याठिकाणी दुचाकीवरून आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यांमध्ये लाल रंगाची चटणी टाकून महिलांच्या गळ्यातील १ लाख ५० हजाराचे दागिने लुटले आणि त्यातील एकाने एका अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील झाडीमध्ये अंधारात फरपटत नेऊन तिच्याबरोबर बलात्कार केल्याची घटना घडली.

या अमानुष घटनेमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!