भोर येथे महाआरोग्य शिबिर संपन्न ; जिद्द फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
भोर : दि. 28 जानेवारी 2025 मंगळवार जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कविताताई खोपडे यांनी भोर तालुक्यातील शेकडो नागरिक- महिलांना आरोग्य सेवा सुविधेचा लाभ देऊन मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. वेळप्रसंगी रुग्णांबरोबर येऊन हॉस्पिटलशी चर्चा करून मदत देखील केलेली आहे .कोणताही राजकीय स्वार्थ किंवा राजकीय प्रसिद्धी पाहिजे असा स्वार्थ मनामध्ये न ठेवता केवळ समाजासाठी काम करायचं ,आपण या मातीशी बांधिलकी जपण्याची मनामध्ये जिद्द ठेवत सातत्याने त्या सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यांचं लोकाभिमुख आहे, असे प्रतिपादन गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भोरच्या प्राचार्य सौ.रेखा पाटील यांनी केले.
रामबाग हॉल भोर ता. भोर येथे जिद्द फाउंडेशन व श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिद्द फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्राचार्य पाटील मॅडम बोलत होत्या.
यावेळेस विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,जिद्द फाऊंडेशन भोर व श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते भोर तालुक्यातील जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घेतल्याचे दिसून आले.
यामध्ये आयड्रॉप,श्रवण यंत्र,वॉकर,वॉकस्टिक,मानेचा व कंबरेचा बेल्ट,MCR चप्पल(शुगर पेशंट साठी),एंकल कॅप, निकॅप( शिबिरामध्ये तपासणी नंतर आवश्यकतेनुसार आरोग्य उपयोगी साधने मोफत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भोर तालुक्यातील 982 स्त्री -पुरुष नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला ,यामध्ये नेत्ररोग तज्ञ ,दंतरोग तज्ञ ,अस्थिरोग तज्ञ ,हृदयरोग,स्त्री रोग ,बालरोग तज्ञ, सर्जन तपासणीत चाचणी औषध उपचार आणि शस्त्रक्रिया हे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटलचे असिस्टंट सुप्रीडेंट डॉ. मधुकर जगताप, उपजिल्हा रुग्णालय भोरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ., अनिल साबणे,गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य रेखाताई पाटील, राजकुमार काळे, सुशील भोसले डॉ.सुनील ढगे, डॉ. वेदांत माळी, डॉ. राजेश भावरे, डॉ. श्रुती गायकवाड, डॉ.गणेश वाडेकर, डॉ. अनिकेत शिंदे, प्रतीक्षा लाटे ,डॉ.ऋतुजा नागरगोजे ,डॉ. खुशी, डॉ.आदित्य पवार, धनाजी नवले, रुपेश पाटकुळकर ,शुभांगी पवार ,आशा कोकणे, सोनाली सुरवसे ,विजय ननवरे ,खंडोजी नंद आबा माळी, शिवाजी पाटील , श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज जनरल हॉस्पिटल पुणे यांची टीम व उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील देखील डॉक्टर्स नर्स या प्रसंगी उपस्थित होते, भोर तालुक्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत संग्राम खलाटे यांनी केले , तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कविताताई खोपडे यांनी केले.
प्रास्ताविकामध्ये बोलताना जिद्द फाउंडेशनचे अध्यक्षा कविताताई खोपडे म्हणाल्या की, मी या समाजाची आहे व समाज माझ्यासाठी आहे, या ध्येयाने या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे तरी या मातीतल्या माणसांसाठी मी सामाजिक विकासासाठी काम करत असून गोरगरिबांची सेवा मला करता यावी यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन शैक्षणिक, सहकार,, कृषी क्रीडा वैद्यकीय काम करूया.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत संग्राम खलाटे त्यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार सर यांनी केले.




