पुत्रदा एकादशीनिमित्त दर्शनासाठी आळंदी मध्ये भाविकांची गर्दी : शुभ मुहूर्त, ग्रहांच्या चाली बदलणार, दुर्मिळ संयोग
आळंदी : पुत्रदा एकादशी निमित्त आळंदी मध्ये माऊलींच्या समाधीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती या वर्षातील पहिली एकादशी असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी आळंदीमध्ये गर्दी केली होती, माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या सकाळी पाहटे पासूनच लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळले पुत्रदा एकादशी असल्याने आळंदीमध्ये माऊलीच्या समाधीला फुलांची आकर्षक अशी सजावट कऱण्यात आली होती, नवीन वर्षाची सुरुवात व पहिली पुत्रदा एकादशी निमित माऊलीचे दर्शन घेण्याकरिता आळंदी भाविकांमुळे सजल्याची दिसली, लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल झाले होते.
तसेच ज्योतिषशास्त्रा प्रमाणे पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 10 जानेवारी पासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. पौष पुत्रदा एकादशी ही 2025 वर्षातील पहिली एकादशी आहे, या एकादशीला ब्रह्मयोग तयार होत असुन ही एकादशी तिथी काही राशींसाठी चांगले दिवस घेऊन येणार आहे, काही राशींच्या लोकांचे नशीब 10 जानेवारी पासून सोन्यासारखं उजळेल आणि त्यांना सर्व सुख प्राप्तीचे योग असल्याचे जाणकारांचे मत आहे.




