एसटी बसचा अपघात, बस थेट शेतात : 42 प्रवासी जखमी
सुनील सावंत, भोर, प्रतिनिधी.
भोर : दि. 30/9/24 (सोमवार) भोर तालुक्याच्या महुडे गावाहून भोरला प्रवाशी घेऊन येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 10:30 वाजता घडली असून या अपघातात 42 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती महूडे,ता.भोर खोऱ्यातून नेहमी प्रमाणे प्रवाशी घेऊन भोरकडे एसटी बस नंबर MH o6, S 8289 येत असताना, महुडे गावाजवळील मोठ्या वळणावर चालकाचे बस वरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला, एसटी बस थेट शेतात शिरली, बस शेतातील चिखलात रूतल्यामुळे पुढील अनर्थ टळला असुन, बस मोठ्या खड्ड्यात आदळल्यामुळे बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.
अचानक हा प्रसंग घडल्यामुळे प्रवाशांनी भरलेल्या या एसटी मधील 42 प्रवासी जखमी झाले असून 39 जखमी प्रवाशांना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, 3 प्रवाशी गंभीर जखमी असुन त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.




